Belagavi

ऊस लागवडीतील बोंडअळी व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र

Share

बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात कर्नाटक राज्य साखर कारखान्यांच्या ऊस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ऊस लागवडीतील बोंडअळी व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्राचे संस्थेचे संचालक डॉ आर.बी.खंडगावे यांनी उद्घाटन केले व त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोंडअळी व्यवस्थापनासाठी संस्थेमार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती दिली व मेटारहायझियम वापरून बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याचे सांगितले. त्यांनी संस्थेच्या प्रयोगशाळेत मेटारहायझियम या जैविक कीटकाचे उत्पादन आणि पुरवठा याबाबत माहिती दिली.

संस्थेच्या कृषी विभागाचे प्रमुख.एन.आर.यक्केली यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक केले व ऊसाच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनावर होणारे परिणाम सांगितले.
परिसंवादाचे प्रमुख पाहुणे डॉ आर. के. पाटील, एमेरिटस प्रोफेसर, कृषी कीटकशास्त्र, कृषी विद्यापीठ, धारवाड यांनी ऊस पिकातील बोंडअळीचे जीवनचक्र आणि त्याच्या सर्वसमावेशक नियंत्रण उपायांविषयी विशद केले.

संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ मंजुनाथ चौरड्डी यांनी कार्यक्रमात उपयुक्त माहिती सांगितली. संस्थेचे कार्यक्रम समन्वयक राघवेंद्र तेगी यावेळी उपस्थित होते .
या कार्यक्रमात कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे 120 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: