बेळगाव कॅंटोन्मेंट भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे . त्यामुळे दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी , पाणी नसल्याने या भागातील जनता हैराण झाली आहे . आमच्या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करून , या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली मराठीला माहिती देताना इथल्या महिला रहिवाशांनी तीव्र नाराजी करीत सांगितले कि , याआधी ४ दिवसांनी पाणी यायचे , आता पंधरा दिवसांनी येत आहे . आम्ही महिलांनी दैनंदिन कामे कशी करायची . आम्हाला पाणी द्या . टँकरने तरी पाणी पुरवठा करा . पंधरा दिवसातून एकदा दोन तास पाणी येते . आम्ही पाण्याचा साठा तरी किती करणार . रमजान असल्याने आम्हाला पाण्याची नितांत गरज आहे . पाण्याअभावी आम्ही हैराण झालो आहोत . त्यामुळे पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली .
आणखी एका रहिवाशाने सांगितले कि , खूप दिवसांपासून कॅम्प एरियात पाणी मिळत नाहीय .. आमच्या सीईओ साहेबाना देखील आम्ही कितींदा याबद्दल सांगितले . इतर ठिकाणी २४ तास पाणी येते मात्र आमच्याकडे एक तास पण पाणी येत नाही . तरी आमच्या भागात पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली .
यावेळी कॅंटोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख आणि रहिवासी उपस्थित होते .


Recent Comments