कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आणि पोलीस दलाला सहायक ठरण्याच्या दृष्टिकोनातून होमगार्डना प्रशिक्षण देण्यात आले.
या चार दिवसाच्या प्रशिक्षणात होमगार्ड कर्मचाऱ्यांना विविध ट्रेनिंग देऊन त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज ठेवण्यात आले आहे.
बेळगाव येथील एपीएमसीजवळील केएसआरपी ट्रेनिंग सेंटरमध्ये या ट्रेनिंगची सुरुवात 28 मार्च रोजी करण्यात आली. त्यानंतर सलग चार दिवस होमगार्ड कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर आज 31 मार्च रोजी या चार दिवशीय प्रशिक्षणाची म्हणजेच ट्रेनिंगची सांगता करण्यात आली.

हा उपक्रम होमगार्ड कमांडंट किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच के एस आर पी कमांडंट रमेश बोरगावी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आल्याचे होमगार्ड इंस्ट्रक्टर राकेश गोनाळ यांनी सांगून प्रशिक्षण उपक्रमाबाबत माहिती दिली.
केएसआरपी ट्रेनर रियाज मुनोळी, होमगार्ड इंस्ट्रक्टर राकेश गोनाळ, रवी कोळी, अथणी, आय. एस. गाळीमठ, खानापूर, आर. सी. परूशेट्टी, कडली, यमकनमर्डी आदींनी ट्रेनिंग यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.


Recent Comments