बेळगाव जिल्ह्यासह राज्यात एसएसएलसी परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 78,772 विध्यार्थ्यानी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
विध्यार्थी दशेतील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला कर्नाटकात आजपासून प्रारंभ झाला. सार्वजनिक शिक्षण खात्याने बेळगाव जिल्ह्यात परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 78,772 विध्यार्थ्यानी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील एकूण 271 केंद्रांवर एसएलएलसी परीक्षा घेण्यात येत आहे. यापैकी 120 परीक्षा केंद्रे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तर 151 परीक्षा केंद्रे चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात आहेत. बेळगाव शहरात 27 केंद्रांवर 8614 विध्यार्थी परीक्षा देत आहेत.

बेळगाव ग्रामीण प्रदेशात 19 केंद्रांवर 5735 विध्यार्थी परीक्षा देत आहेत. खानापूर तालुक्यात 16 केंद्रे असून तेथे 3758 विध्यार्थी परीक्षा देत आहेत.
बेळगाव जिल्ह्यात 33,182 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 45,590 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे. परीक्षा लिहिण्यासाठी प्रत्येक खोलीत 24 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था केली आहे.
परीक्षा केंद्रात सीसी कॅमेरे बसवण्यात आले असून केंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण खात्याने भरारी पथकांचीही नेमणूक केली आहे. विध्यार्थ्यांसाठी केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालय, वैद्यकीय मदत उपलब्ध करून दे


Recent Comments