Belagavi

बेळगावात देशपांडे स्टार्टअप्सतर्फे महिला दिन

Share

देशपांडे स्टार्ट अपच्यावतीने बेळगावातील कन्नड साहित्य भवनात महिला दिन साजरा करण्यात आला.

हुबळीतील देशपांडे फौंडेशनच्या सहयोगाने आयोजित या महिला दिन कार्यक्रमात महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. अनिता उमदी यांनी सांगितले की, अनेक महिला आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाहीत. आपल्या कामात बिझी राहून आपल्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. स्तनाचा कर्करोग सारखे महिलांचे आजार वाढत चालले आहेत. ते वेळीच रोखण्यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण केल्यावर महिलांनी डॉक्टरांकरवी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी रेवती हिरेमठ, पूर्णिमा पत्तार, वीरय्या हिरेमठ आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: