Belagavi

अनुभव मंडप विकास कामकाजाच्या पूजनावेळी वादविवाद

Share

बेळगाव उत्तरचे आ . अनिल बेनके यांनी अनुभव मंडप विकास कामकाजाच्या पूजनावेळी, विविध लिंगायत संघटनांनी आक्षेप घेतला . या अनुभव मंडपाच्या बाजूस कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधून अनुभव मंडपासाठी अडचण करू नये असा आग्रह लिंगायत नेत्यांनी केला . यावेळी लिंगायत नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली . मात्र आ . अनिल बेनके यांनी मध्यस्थी करून , हा वाद मिटवला आणि , अनुभव मंडपासमोर कमर्शिअल कॉम्प्लेक्स होणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिल्यावर हा वाद मिटला .

माळमारुती एक्सटेंन्शन एरियात , संगोळी रायन्ना महाविद्यालयाच्या मागील बाजूस , अनुभव मंडप उभारण्यात आला आहे . काही वर्षांपासून याचे काम अर्धवट आहे . मात्र आज कारंजीमठाच्या स्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात , उर्वरित कामकाज सुरु करण्यासाठी आ .अनिल बेनके, आले असता लिंगायत महासभा आणि अन्य संघटनांनी याला आक्षेप घेतला . यावेळी आमदारांचे समर्थक आणि ,बसवराज रोटी यांच्यात वादविवाद झाला .

यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी सांगितले कि , या अनुभव मंडपाच्या समोर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधू नये . अशी आम्ही आमदारांना कळकळीची विनंती करीत आहोत . सर्व समाजांना शरण संस्कृती कळायला हवी . ती आमच्या समाजापुरती मर्यादित नको . बसवण्णांची तत्वे सर्वाना काली पाहिजेत असे ते म्हणाले .

तर ऍड . एम बी जिरली म्हणाले कि , अनुभव मंडपासमोर कमर्शियल कॉम्प्लेक्स निर्माण करू नये अशी विनंती आमदारांना केली आहे . कारण बसवं आणि शरण संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा अनुभव मंडप बांधण्यात आला आहे . इतक्या वर्षानंतर , ह्या इमारतीचे काम पुन्हा सुरु होत आहे . कुठली कमतरता असेल तर ती पूर्ण केली जाईल .

तर लिंगायत नेते शशिभूषण पाटील म्हणाले कि , २० वर्षांपासून , लिंगायत समाजासाठी काम करीत आहे . मी कधीही संस्थेला विरोध दर्शवला आंही . या अनुभव मंडपाच्या विकासासाठी कमिटी नेमून दोन वेळा मिटिंग घेण्यात आली . त्यानुसारच आज कामकाजाची पूजा करण्याचे ठरवले होते .

शेवटी अनुभव मंडपाच्या समोरील भागात , कमर्शिअल कम्प्लेक्स उभारण्याच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ . अनिल बेनके म्हणाले कि , तांड्यांशी याबाबातीती चर्चा केली आहे . अरविंद जत्ती यांच्याकडून माहिती घेतली आहे . तिथून पीपीपीपी अंतर्गत महानगर पालिकेने ही जागा स्मार्टसिटीने अलॉटमेंट केली आहे . ही जागा अनुभव मंडपासाठी दिली जाईल असे आ . अनिल बेनके यांनी सांगितले .

बेळगाव उत्तरचे आ . अनिल बेनके यांच्या आश्वासनानंतर , लिंगायत नेत्यांमधील वाद मिटला असून अनुभव मंडपाच्या उर्वरित कामकाजासाठी पूजन करण्यात आले

Tags: