हुबळी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या हरे कृष्ण प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्यावतीने श्री राधाकृष्ण रथयात्रा शनिवार व रविवार असे दोन दिवस उत्साही वातावरणात व भक्तांच्या उपस्थितीत पार पडली.
रविवारी दुपारी २ वाजता रथ यात्रेला प्रारंभ झाला. ग्रामपंचायत सदस्य, कलमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे उद्घाटन करण्यात आले. यात्रेला हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा नेते आर. एम. चौगुले, धनंजय जाधव, संजय बी. पाटील, विनय विलास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रमुख अतिथींनी हरिनाम संकिर्तनाचा आनंद लुटला. यात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, कलश पथक, लेझीम पथक, मल्लखांब, बैलगाडी

सजावट, चित्ररथ आणि कीर्तनसह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. श्री परम पूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमात परम पूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे विशेष प्रवचन झाले. नाट्यलीला, मल्लखांब, महाप्रसाद आणि श्रीहरी संगीत भजन कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. संपूर्ण गाव कृष्ण भक्तीरसात न्हाऊन गेले. मिरवणूक शुभारंभप्रसंगी युवकांनी ठिकठिकाणी सरबत, पुलाव, कोकम, फळे, पाणी यांचे वाटप केले. ग्रामस्थ, महिला, युवक मंडळांच्या सहकार्यातून साकारलेली रथयात्रा यावर्षीही उत्साही वातावरणात पार पडली.


Recent Comments