Belagavi

उमेदवारही न मिळण्याइतपत काँग्रेस पक्ष दिवाळखोर : मुख्यमंत्री बोम्मई

Share

केपीसीसीचे अध्यक्ष डीकेशी गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यांना ते तिकीट देण्याचे आश्वासन देत आहेत. हताश होऊन ते आमच्या पक्षाच्या सदस्यांशी संपर्क साधत आहेत.

काँग्रेस पक्ष दिवाळखोर झाल्याचा हा पुरावा आहे असा टोला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हाणला. सुवर्णसौधसमोरील राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणासाठी आले असता, प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसला निवडणुकीसाठी उमेदवारसुद्धा मिळत नसल्याचा आरोप केला. त्यामुळेच डीकेशी आमच्या आमदारांना फोन करून संपर्क साधत आहेत, तिकीट देण्याचे आश्वासन देत आहेत. हताश होऊन ते आमच्या पक्षाच्या सदस्यांशी संपर्क साधत आहेत. काँग्रेस पक्ष दिवाळखोर झाल्याचा हा पुरावा असल्याची टीका त्यांनी केली.

एसडीपीआय संघटनेचे मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावर एसडीपीआय माझी स्तुती करू शकेल का? असा प्रतिप्रश्न करून बोम्मई म्हणाले की, एसडीपीआय ही एक देशद्रोही संघटना आहे. ते देशाविरुद्ध काम करतात. एसडीपीआय ही भारतातील अल्पसंख्याकांच्याही विरोधात आहे. मला त्यांच्याकडून कौतुक नको आहे. ते आमच्या विरोधात नेहमीच असतात. त्यांची आमची विचारधारा वेगळी आहे. लोकच काय ते ठरवतील. त्यांनी नेमके काय विधान केले याचा अभ्यास करून कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल असे त्यांनी सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. अथणीत भाजप उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याच्या मुद्द्यावर, जिंकून येणाऱ्या पक्षात उमेदवारीसाठी नेहमीच रस्सीखेच सुरु असते असे बोम्मई म्हणाले.

एकंदर, काँग्रेसला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारही न मिळण्याइतपत तो पक्ष दिवाळखोर झाल्याची टीका मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे.

Tags: