तीन कोटी रु. खर्च करून बांधण्यात येणाऱ्या बंजारा समाज भवनाच्या बांधकामासाठी आमदार पी. राजीव आणि अनिल बेनके यांनी भूमिपूजन केले.
संगमेश्वर नगर, बाबू जगजीवनराव उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या महापालिकेच्या जागेत बंजारा समाज भवन उभारण्यासाठी , भूमिपूजन करून बांधकामाचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना आमदार पी. राजीव म्हणाले की, शहरात कामासाठी आलेला बंजारा समाज अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. ही त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तांडा विकास महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर मलाही बंजारा समाजासाठी भवन बांधायचे होते. आमदार बेनाके यांना विनंती केली. महापालिकेने जागा दिल्यास आमच्या समाजाचे भले होईल. त्यांचे प्रयत्न आणि महामंडळाच्या सदस्या लक्ष्मी राठोड यांच्या योगदानामुळे भव्य इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार अनिल बेनके म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून बंजारा समाजाची भवन बांधण्याची मागणी आहे. मी गेल्या चार वर्षांपासून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या भागात बंजारा समाजाचे अनेक लोक राहतात. त्यांच्यासाठी समाज भवन बांधण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या अभ्यासासाठी स्टडी सर्कल तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे अधिकारी , तसेच बंजारा समाजाचे नेते उपस्थित होते .


Recent Comments