काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेकजण इच्छुक नाराज झालेत हे सत्य आहे. त्यांची नाराजी दूर केली जाईल अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली. विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ वाचाळवीर आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
गोकाक येथील आपल्या गृहकचेरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी पहिल्या यादीत जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांची नाराजी कशी दूर करणार या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमधील असंतुष्टांची नजर दूर करावी लागेल यावर भर दिला. निवडणुकीत तिकिटासाठी अनेकजण इच्छुक असतात. पण सगळ्यांनाच उमेदवारी देता येत नाही हेही तितकेच खरे आहे. शेवटी हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. पण पक्षाच्या विजयासाठी त्यांची समजूत घालावी लागेल. सगळ्यांना एकत्र घेऊन गेल्यानेच विजय सोपा होतो असे त्यांनी सांगितले.
विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी, केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना यत्नाळ वाचाळवीर आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विजापूरपुरते मर्यादित आहे. आमचे कार्यक्षेत्र मोठे आहे, आम्हाला अनेक कामे आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ते येडियुरप्पा, निराणी यांच्यासारख्या स्वपक्षीयांना सोडत नाहीत, मग आमच्यावर का टीका करणार नाहीत? आम्ही लिंगायतांवर टीका केली नाही, केवळ आमचे विरोधक असे बोललो होतो. पण ते विनाकारण टीका, अपप्रचार करत सुटले आहेत. त्यांची अन आमची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच चांगले. जाती-धर्मावरून भेद करून निवडणूक जिंकता येत नाही, लोक केलेला विकासदेखील पाहतात असा पलटवार सतीश जारकीहोळी यांनी केला.
एकंदर, तिकीट न मिळालेल्या पक्षातील असंतुष्टांची नाराजी दूर करणार असल्याचे आ. सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments