Belagavi

कडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न

Share

कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम देवता व धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिराचा जत्रामहोत्सव पार पडला.

ढोलवाद्य,भंडारा उधळत, जयघोष करीत , पालखी मिरवणूक, अलग भाकणुक,महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत श्रद्धाभक्तीभाव व भंडारामय वातावरणात संपन्न झाला .

मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण न झाल्याने प्रथम ब्रम्हचारी व्यक्ती ,पाच सुवासिनी आणि पुरोहितांमार्फत विधिवत पुजनाने कलश व नारळ ठेवल्यानंतरच जत्रेला सुरुवात झाली . सुहासिनींतर्फे सवाद्य आंबील व दुधाचे कलश आणण्याबरोबरच , नवस केलेल्या भाविक भक्तानीं दिड नमस्कार,दंडवत घालणे आदि कार्यक्रम पार पडले .

नंतर स्थानिक आमदार व कांग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सतिश जारकिहोळी याची मंदिर विकास कार्याला आपल्या फंडातुन पाच लाख रु . मंजूर केल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्ता शिवाजी कागणिकर यांना डाक्टरेट मिळाल्याने तसेच माजी कर्नाटक कुरुबर महासंघाचे अध्यक्ष व कांग्रेस पक्षाचे चिक्कोडी जि.अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे व गावातीलच अत्यंत अनुभवी जेष्ठ नागरिक भागाण्णा नरोटी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

तर यावेळी शिवाजी कागणिकर व चिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर पिरणवाडी व अनगोळ गावच्या गायन संघातर्फे धनगरी गाण्यांची रात्रजागरण झाली . दुसऱ्या दिवशी पहाटे अभिषेकासह , विधिवत पूजनाने जत्रेला सुरुवात होऊन सकाळी अकरानंतर ढोलवाद्यासह गावभर व प्रत्येक मंदिराला भेट देऊन पूजा करण्यासह पालखी मिरवणूक काढुन पालखी परत मंदिरजवळ आल्यानंतर मुख्य जत्रामहोत्सवाला सुरुवात झाली . भाकणुक आणि भाविक भक्तां नी श्री विठ्ठल बिरदेवाचा जयघोष केला .

भंडारा,खारिक,खोबरे, बकऱ्यांची लोकर उधळत नवस केलेल्या भक्तांनी , खाली पडलेल्या भंडार्यामध्ये लोटांगण घातले . कडोलीचे देवर्षी शिवाजी गावडे,धामण्याचे देवर्षी,मुतग्याचे देवर्षी यांचे अलग व भाकणुकिसह मुख्य पारंपारिक धार्मिक विधी झाल्यानंतर महाप्रसादाने जत्रेची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व देवर्षिंची मानपानासह पूजा करण्यात आली . .नंतर सुतगट्टी येथील घटप्रभा नदीवर जत्रेमध्ये देवाला घातलेले हार व पूजा साहित्य वैगेरे विसर्जन करून , पूजा केल्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्णपणे जत्रोत्सवाची सांगता झाली.

Tags: