Belagavi

कंग्राळी के एच गावातील वसाहतींमध्ये विकास कामे

Share

“माझ्या राजकीय विरोधकांना केवळ राजकारणासाठी माझ्याबद्दल आक्षेप घ्यायचे आहेत आणि विकासाच्या बाबतीत आक्षेप घेण्याची संधी उरलेली नाही. याचे सर्व श्रेय जनतेला जाते असे आ . लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या .

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंग्राळी केएच गावातील सिद्धेश्वर नगर आणि रझाक कॉलनी येथील काँक्रीट रस्ता व गटारी बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या . या रस्त्यांच्या कामासाठी लक्ष्मी हेब्बाळकर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४६ लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत .

“मी या क्षेत्रात जात, धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून केवळ विकासाचे ध्येय ठेवून काम केले आहे. या विकास मोहिमेत मी फक्त मुले आणि महिलांनाच नव्हे तर सर्वांना समानतेने वागवले आहे. मी कुठेही भेदभाव होऊ दिलेला नाही. सामान्य लोकांमध्ये एक सामान्य माणूस म्हणून क्षेत्राच्या विकासात सहभागी झालो.घाणेरडे राजकारण करण्याऐवजी विकास केला.आज जनता मला साथ देत आहे . त्यांची मी सदैव ऋणी आहे. असे आ . लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या .

येत्या निवडणुकीत जनतेने मला प्रामाणिकपणे पाठिंबा दिल्यास या मतदारसंघाचा सेवक म्हणून समृद्ध, सुसज्ज यंत्रणा उभारण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या .

यावेळी स्थानिक रहिवासी खताल दावणगेरी, अब्दुल रझाक, सलीम पीरजादे, कलीम जमादार, युनूस काकती आदी उपस्थित होते.

Tags: