समाजाच्या जडणघडणीसाठी, समाजात सुखशांती नांदण्यासाठी श्री देवर दासीमैय्या आणि समकालीन शरणांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी केले.
बेळगावच्या खासबागमधील श्री बनशंकरी मंदिर सभागृहात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि महानगर पालिका आदींच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या आद्य वचनकार श्री देवर दासीमैय्या यांच्या जयंतीचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आ. अभय पाटील यांनी विश्वगुरू बसवण्णा, त्यांचे अनुयायी श्री देवर दासीमैय्या आणि समकालीन शरणांनी समाजासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास आदर्श समाजाची निर्मिती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी आद्य वचनकार श्री देवर दासीमैय्या यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या साथीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. आ. अभय पाटील यांनी ढोल वाजवून मिरवणुकीला चालना दिली. यावेळी लोक कलाकारांनी पारंपरिक वाध्ये वाजवून कला प्रदर्शन घडविले. खासबागमधील विविध मार्गांवरून फिरून बनशंकरी मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी पालिका उपयुक्त भाग्यश्री हुग्गी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उप संचालिका विद्यावती भजंत्री, दीपाली टोपगी, रेश्मा कामकर, मारुती शरण, व्यंकटेश वनहळ्ळी, नारायण कुलगोड आणि देवर दासीमैय्या समाजाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments