Belagavi

वॉर्ड क्रमांक 29मध्ये कूपनलिकेची खोदाई

Share

आमदार अभय पाटील यांच्या निधीतून वॉर्ड क्रमांक 29 येथील गवळी गल्ली मंगळवार पेठ टिळकवाडी येथे कूपनलिका खोदण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर वार्डातील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी नगरसेवक नितिन ना. जाधव यांच्या पाठपुराव्यातून आ. अभय पाटील यांच्या निधीतून वॉर्ड क्रमांक 29 येथील गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे कूपनलिका खोदण्यात आली. तिला 2इंच पाणी लागले आहे. त्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी नगरसेवक नितिन ना. जाधव यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी गल्लीतील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Tags: