Belagavi

निराधार व्यक्तीला दिला यंग बेलगाम फाउंडेशनने आधार

Share

गुडस शेड रोडवर गेल्या पाच दिवसांपासून झोपलेल्या निराधार व्यक्तीला , यंग बेलगाम फाऊंडेशच्या कार्यकर्त्यांनी खासबाग येथील आश्रमात दाखल केले .

सॅम्युअल रॉड्रिग्ज आणि अॅलन मोरे या दोघांना या व्यक्तीबद्दल कळताच , त्यांनी ताबडतोब या निराधार व्यक्तीची विचारपूस करून , जयभारत मातानगर ग्रामीण संस्था जमखंडी संचलित आश्रमात दाखल केले . त्यांना महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ .संजय डुमगोळ व निसार समशेर यांचे सहकार्य लाभले .

Tags: