Belagavi

“जितो”तर्फे बेळगावात 2 एप्रिलला अहिंसा रन रॅली

Share

जैन उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेंड ऑर्गनायझेशन (जितो)तर्फे बेळगावात येत्या 2 एप्रिलला अहिंसा रन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसेचा संदेश देण्यासाठी देशभरात एकाच दिवशी एकाचवेळी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना जितोचे निमंत्रक विजयकुमार बाळीकाई यांनी सांगितले की, आजच्या घडीला भगवान महावीरांच्या अहिंसेचा संदेश देशभरात पसरविण्यासाठी जितोने अहिंसा रन रॅलीचा उपक्रम राबविला आहे. देशभरात एकाच दिवशी एकाचवेळी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. बेळगावात येत्या 2 एप्रिलला सायंकाळी 5.30 अहिंसा रन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प परिसराची मराठी विद्यानिकेतन-ज्योती कॉलेज मैदानावरून रॅलीला प्रारंभ होईल.

त्यानंतर क्लब रोडवरील महात्मा गांधी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा मराठी विद्यानिकेतनपर्यंत रॅली काढून तेथे रॅलीची सांगता करण्यात येईल. रॅलीत सहभागी होणाऱ्याना टीशर्ट्स, पदक व अल्पोपहार देण्यात येणार आहे. रॅलीत सहभागासाठी केवळ आयोजनाचा खर्च म्हणून 300 रुपये आकारण्यात येणार आहेत. 13 वर्षांवरील कोणीही या रॅलीत सहभागी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. नोंदणीसाठी 26 मार्चपर्यंत मुदत आहे. आजवर बेळगावात 2 हजार जणांनी नोंदणी केली असून, संपूर्ण देशात 1 लाख जणांनी नोंदणी केल्याचे बाळीकाई यांनी सांगितले.

यावेळी अहिंसा रन रॅलीच्या टीशर्ट्सचे अनावरण करण्यात आले. जितोच्या पदाधिकारी डॉ. अंजना बागेवाडी, शोभा दोड्डण्णावर, इव्हेंट चेअरमन मुकेश पोरवाल, भारती हार्दी, दीपक आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Tags: