सुमारे 100 वर्ष जुन्या वृक्षाची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी पर्यावरण प्रेमीनी आणि भाजप नेते किरण जाधव यांनी केली आहे .
वॅक्सीन डेपो रोड टिळकवाडी रोड वरील ही घटना फॉरेस्ट विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड करत असल्याचे पर्यावरण प्रेमीच्या निदर्शनास आले त्यांनी त्वरित किरण जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली
कोणताही विलंब न करता जाधव घटनास्थळी दाखल झाले व येथील फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्ष तोडण्यासंदर्भात जाब विचारू लागले सदर अधिकाऱ्यांकडून येथील अनेक नागरिकांनी वृक्षा संदर्भात तक्रारी केल्याचे सांगण्यात आले तसेच ट्रॅफिकची देखील समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले
यावर कोणतेही लेखी तक्रार अधिकाऱ्यांना दाखवता आली नाही याउलट या अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली वन विभागातील काही अधिकारी कोणाच्यातरी व्यवसायिक फायद्यासाठी सदर वृक्ष तोडत आहेत असे येथील पर्यावरण प्रेमींनी निदर्शनास आणून दिले. सदर वृक्षतोडी संदर्भात कोर्टाने देखील वृक्षतोड न करण्याचा निर्णय दिला आहे तरीदेखील हा प्रकार घडत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली संतप्त पर्यावरणप्रेमी व किरण जाधव यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

किरण जाधव यांनी बेकायदेशीर कत्तल करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे


Recent Comments