बेळगाव उत्तर मतदारसंघातील रामतीर्थ नगरातील महिला वसतिगृहाचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याशिवाय विविध ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजनही त्यांनी केले.
होय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेळगावात विकासकामांच्या भूमिपूजन, उदघाटनाला आहे. बेळगाव उत्तर मतदार संघातील रामतीर्थ नगरातील सरकारी महिला वसतिगृहाचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. त्याशिवाय विविध ठिकाणच्या रस्ते, गटारी आदी विकासकामांसाठी यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यमनापूर गावात ४८ लाखांच्या अनुदानातून डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, यमनापूर, बसनकोळ्ळ, मुत्त्यानट्टी आदी ठिकाणच्या रस्ते, गटारी आदी विकासकामांसाठी आज भूमिपूजन करण्यात आले आहे. विशेषतः यमनापूर येथील रस्त्याची दोन अडीज वर्षांपासून होत होती. ती आज पूर्ण करून कामाला प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे रामतीर्थ नगरात महिला वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले असून, तेथे उद्यापासूनच महिलांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर बसवराज चिक्कलदीनी, विष्णू कोनेवाडी, महेश पाटील सुरेश पाटील. शामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments