Belagavi

बाळेकुंद्री-मुतगा येथे रस्त्याच्या कामांना प्रारंभ; आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले भूमिपूजन

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बाळेकुंद्री बुद्रुक गावातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून 1.87 कोटी रुपये निधी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून त्यांच्याच हस्ते शनिवारी रस्ते बांधणीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या निधीतून दत्त कॉलनी, पंतनगर, हनुमाननगर, अवधूतनगर, लक्ष्मी कॉलनी येथील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मोठे प्रयत्न करून काम मंजूर करून घेण्यात आ. हेब्बाळकर यांना यश आले आहे. आ. हेब्बाळकर यांनी कंत्राटदारांना कामात गुणवत्ता राखून मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी गावातील वडीलधारी मंडळी मैनुद्दीन अगसिमानी, रोज कोलकार, अफसर जमादार, बसप्पा, कल्लाप्पा कलखांबकर, जमील काझी, चंदू पाटील, अशोक पत्तार, प्रल्हाद पाटील, सागर पाटील, अल्ताफ यादवाड, कल्लाप्पा हिरोजी, पार्वती तळवार, बीबीहमिदा, निंगनगौडा पाटील, बी. बी. सुंकद, गीता गुजनट्टी, गौस सुतार, एच. के. भगवान आदी उपस्थित होते.

मुतगा गावातील व्यंकटेश नगर येथील रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून 24 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी गजानन कणबरकर, पिंटू मल्लवगोळ, श्याम मुतगेकर, कृष्णा पाटील, सचिन पाटील, शरद पाटील, राधिका मुतगेकर, बागण्णा मल्लवगोळ आदी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Tags: