बेळगाव तालुक्यातील राजहंसगड किल्ला परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर 21 मार्च ते 4 मे या कालावधीत सार्वजनिक व पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेशबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत.
राजहंसगड किल्ला परिसरातील विविध विकास कामांपैकी एक रस्त्याचे ग्रॅनाईट दगडी बांधकाम पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, दररोज मोठ्या संख्येने पर्यटक व लोकांची ये-जा होत असल्याने हे काम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे अवघड आहे. त्यामुळे 15 दिवस लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची विनंती जिल्हा पर्यटन विभागाच्या उपसंचालकांनी केली आहे. त्यामुळे कामाच्या हितासाठी गडावर प्रवेशबंदी करण्यात आली असून जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


Recent Comments