स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात , निर्यातीचे , ७५० बिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणार असल्याचे , केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले .
बेळगावमधील उद्यमबाग येथे , चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या , संवाद कार्यक्रमात ते बोलत होते . ते म्हणाले कि , गेल्या ४ ते पाच वर्षात , आपण जगाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. आपली देशाची फार वेगाने प्रगती होत आहे . २०२०-२१ मध्ये निर्यात ५०० बिलियन डॉलर इतकी होती तर मागील वर्षी ६७६ बिलियन डॉलर्सवर पोचली आहे . आता आम्ही वस्तू आणि सेवा निर्यातीत ऐतिहासिक रेकॉर्ड केले आहे . यंदा , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात , ७६० बिलियन डॉलर्सचे रेकॉर्ड करणार आहोत . यावेळी त्यांनी दिवंगत सुरेश अंगडी यांची आठवण काढून , आम्ही त्यांचे कार्य विसरू शकत नाही असे ते म्हणाले.
यावेळी आ . अभय पाटील यांनी , आमचा सेमी कंडक्टर पार्क बनवण्याचा विचार आहे . सरकारची ६० ते ७५ एकर जमीन संरक्षण विभागाकडे आहे . येडियुरप्पा संरक्षण मंत्री असताना त्यांना या बद्दल पत्र लिहिले होते . आमची ही समस्या सोडवा आमची जमीन आम्हाला परत द्या . अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली .
यावेळी खा . मंगला अंगडी यांनीही आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाला उदयमबाग मधील उद्योजक उपस्थित होते .


Recent Comments