Belagavi

कन्नड महिला संघातर्फे “रागरंजनी” गायनस्पर्धा

Share

बेळगावातील कन्नड महिला संघातर्फे टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात महिला व पुरुषांसाठी “रागरंजनी” गायनस्पर्धा घेण्यात आल्या.

बेळगावातील कन्नड महिला संघातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिवाय पुरुषांसाठी देखील काही उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात महिला व पुरुषांसाठी “रागरंजनी” गायनस्पर्धा घेण्यात आल्या.

या संदर्भात माहिती देताना संघाच्या संस्थापिका रंजना नायक यांनी सांगितले की, सुमारे ५० वर्षांपूर्वी कन्नड महिला संघाची स्थापना करण्यात आली असून, १० वर्षांपासून रागरंजनी गायनस्पर्धा घेण्यात येत आहेत. कोरोनामुळे मध्यंतरी हा उपक्रम बंद पडला होता. पण सर्व सदस्यांच्या आग्रहामुळे पुन्हा तो सुरु करण्यात आला आहे.

संघाच्या अध्यक्षा शुभदा कोठूरकर यांनी सांगितले की, रागरंजनी गायनस्पर्धेत किमान ५ सदस्य असलेल्या महिला व पुरुष संघाना भाग घेता येतो. त्यांनी दासर पदे गेली पाहिजेत. ७ हुन अधिक संघांनी स्पर्धेत भाग घेतला. गुरुदास कुलकर्णी व राजश्री हेब्बाळकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले आहे. स्पर्धा संपल्यानंतर प्रमुख पाहुणे भाजप नेते किरण जाधव आणि भारती भट्ट यांच्याहस्ते विजेत्या संघांना भरघोस बक्षिसे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत विविध महिला व पुरुष संघांनी सुरेल आवाजात दासर पदे गाऊन उपस्थित रसिकांची मने जिंकली. यावेळी कन्नड महिला संघाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: