Belagavi

रोटरी क्‍लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे 2 एप्रिलला हास्यकवी संमेलन

Share

रोटरी क्‍लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या वतीने सामाजिक कामांसाठी निधी उभारण्याकरिता 2 एप्रिल 2023 रोजी बेळगावात हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्लबचे अध्यक्ष रवी हत्तरकी, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, रोटरी क्‍लब ऑफ बेळगाव सेंट्रल 2015 पासून समाजसेवेच्‍या दिशेने काम करत आहे. आम्‍ही कृत्रिम अवयव रोपण, मुलींसाठी शौचालये बांधणे आणि सरकारी शाळांमध्ये पिण्‍याच्‍या पाण्याची सुविधा, 100 लाभार्थींसाठी मोफत नेत्र शस्त्रक्रिया आदी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आम्ही येत्या काही महिन्यांत 3 सरकारी शाळांमध्ये टॉयलेट ब्लॉक आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी निधी उभारणीचा उपक्रम म्हणून 2 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जेएनएमसीच्या डॉ. राजशेखर सभागृहात “हास्यकवी संमेलन” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आज आम्ही “हास्यकवी संमेलन” कार्यक्रमाचे डोनेशन पास लोकांसाठी लाँच करत आहोत, मीडिया आणि प्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्व बेळगाववासीयांना विनंती करतो की त्यांनी आमच्याकडून डोनेशन पास मिळवून हा कार्यक्रम यशस्वी करावा आणि शाळकरी मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय व मुलींना लेडीज टॉयलेट बांधण्यासाठी मदत करावी.
पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे खजिनदार भरतेश पाटील, अभिनंदन दरगशेट्टी, क्लबचे सहसचिव अभय जोशी आदी उपस्थित होते.

Tags: