विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील काखकवटगी, घोणसगी, बाबानगर, हुबनूर, टक्कलकी, लोहगाव, बिज्जरगी, सोमादेवरहट्टी, मलकनदेवरहट्टी या सर्व गावांमध्ये रॅकमधील वाळत घातलेले द्राक्षे व बेदाणे पावसाने भिजले.
पावसामुळे द्राक्षे भिजत असल्याने साखरेचे प्रमाण कमी होऊन भाव कमी होतात. रॅकमधील बेदाणे भिजल्यामुळे काळे होतात आणि भाव गडगडतात . दरवर्षी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करणारा द्राक्ष उत्पादक पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने द्राक्ष उत्पादकांच्या दुरावस्थेबाबत तात्काळ प्रतिसाद द्यावा, नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांना योग्य ती भरपाई द्यावी, तसेच तिकोटा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पदक शेतकऱ्यावर संसक्त ओढवले आहे .


Recent Comments