चांगदेव उर्फ राजेबागसवार यात्रा बेळगावात भक्तिभावाने, विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
रामतीर्थ नगरातील चांगदेव नगरमधील मंदिरात शनिवार ११ मार्चपासून सुरु झालेल्या चांगदेव उर्फ राजेबागसवार यात्रेत दररोज विविध धार्मिक उपक्रम पार पडले.
चांगदेव आज्जांची पालखी मिरवणूक, महापूजा, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त रामतीर्थनगर, चांगदेव नगर आणि आसपासच्या नागरिकांनी मंदिरात येऊन धार्मिक कार्यक्रमात श्रद्धा-भक्तीने भाग घेतला.
यात्रा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष सुभाष आज्जा मातंगी, उपाध्यक्ष बसवराज दोडमनी, सदस्य लोकेश बेंगळूर, महांतेश चव्हाण, विनय बेंगळूर, संतोष बसवराज माळगी आदींनी परिश्रम घेतले.


Recent Comments