खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावात संथ गतीने असुर असलेले जलजीवन योजनेचे काम लवकर पूर्ण करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत सदस्या पद्मश्री मनोहर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
ग्रामीण पेयजल विभागाच्या कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना पद्मश्री पाटील यांनी सांगितले की, आमच्या गावात बरगाव पंचायतीने 22 ऑक्टोबर रोजी जल जीवन मिशन प्रकल्प सुरू केला आहे, परंतु ठेकेदार बसवराज हुंदरी हे काम लवकर पूर्ण करत नाही. या कामासाठी 1 कोटी 18 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र काम दर्जेदार होत नाही. सर्वच रस्त्यांवरील काम अर्धवट थांबले आहे. त्यामुळे मी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना विनंती करते की, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. बाईट


Recent Comments