कर्नाटक लॉ सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्चतर्फे ‘बिझनेस इनोव्हेशन अँड सस्टेनेबिलिटी’वरील आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.
बेळगावातील केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्चच्या सभागृहात ‘बिझनेस इनोव्हेशन अँड सस्टेनेबिलिटी’-ए रोड मॅप फॉर बिझनेस एक्सलन्स या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. आंतरराष्ट्रीय परिषदेला देशभरातून इनोव्हेशन, बिझनेस, टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबिलिटी या क्षेत्रातील 65 हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले.
याप्रसंगी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रणालयाचे संचालक डॉ. अरविंद कुलकर्णी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आयएमईआर संचालन समिती अध्यक्ष आर. एस. मुतालिक होते.
संचालक डॉ. आरिफ शेख यांनी स्वागत केले. संयोजक प्रा. डॉ. पी. एम. कुलकर्णी यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती दिली.
डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी, व्यवसायाच्या भविष्यातील वाढीसाठी शाश्वततेच्या भूमिकेवर भर दिला. जगाच्या भावी पिढ्यांसाठी प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्याचे महत्त्वही त्यांनी नमूद केले. देशाच्या उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी व्यवसाय आणि शाश्वतता यांच्यातील सहकार्याचे महत्त्व सांगितले.
आर. एस. मुतालिक यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांनी उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या संदर्भात नाविन्यपूर्ण आणि व्यवसाय टिकवण्याची भूमिका आणि महत्त्व नमूद केले.
डॉ.शैलजा हिरेमठ यांनी आभार मानले.


Recent Comments