बेळगावमध्ये भव्य रोड शो करून मोदींनी जनतेला भारावून सोडले आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ करून , गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले असे , काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगितले .
बेळगावमधील काँग्रेस कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . भाजपच्या सत्ताकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत . पंतप्रधान मोदी रोड शो आणि अन्य कार्यक्रमासाठी कर्नाटकात येऊन, जनतेला आमिष दाखवत आहेत . नुकत्याच त्यांनी बेळगावात केलेल्या रोड शो नंतर दिल्लीला गेल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले .
बेळगावमध्ये काँग्रेसचा महामेळावा होणार आहे . या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी प्रथमच जनतेला संबोधित करणार आहेत .
भाजप सरकार कर्नाटकातील सुशिक्षित जनतेची फसवणूक करत आहे. मोदींनी तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे दिलेले आश्वासन खोटे ठरले आहे . आम्ही कर्नाटक एका हमीपत्राचे अनावरण करणार आहे ज्याचा फायदा तरुण समाजाला होईल. युवा समाजाला डोळ्यासमोर ठेवून या हमीपत्राचे अनावरण करण्यात येणार आहे. ‘युवा क्रांती’ या नावाने हमीपत्राचे अनावरण केले जाईल. अशी माहिती त्यांनी दिली .


Recent Comments