बेळगाव तालुक्यातील हलगा ग्रामपंचायती च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सागर कामाण्णाचे विजयी झाले .
बेळगाव तालुक्यातील हलगा ग्रामपंचायती च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सागर कामाण्णाचे आणि तवनाप्पा पायका यांच्यात लढत झाली .सागर कामाण्णाचे याना 10 मते तर तवनाप्पा पायका यांना 8 मते पडली . या निवडणुकीत कामाण्णाचे विजयी झाले .

हलगा ग्राम पंचायतीचे नूतन अध्यक्ष सागर कामाण्णाचे यांनी त्यांना अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले . सर्वजण मिळून, कोणताही भेदभाव न ठेवता गावाच्या विकासासाठी कार्य करूयात , सर्वाना विश्वासात घेऊन पुढे जाऊयात असे ते म्हणाले
यावेळी ग्राम पंचायतीकडून तसेच मित्रपरिवाराकडून , नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला .
सागर वैशाली तुडवेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले . ग्रामपंचायत पी डि ओ विजयलक्ष्मी तिग्गी व ग्रामपंचायत सेक्रेटरी जोशब फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते


Recent Comments