बेळगाव काँग्रेस कार्यालयात केपीसीसी अध्यक्ष डीकेशी, सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.हायकमांडला पाठवलेल्या यादीतून रमेश कुडची यांचे नाव वगळल्याने रमेश कुडची समर्थकांनी संताप व्यक्त केला.
रमेश कुडची हे बेळगाव दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक आहेत.मात्र हायकमांडला पाठवलेल्या यादीतून रमेश कुडची यांचे नाव वगळण्यात आले आहे . त्यांचे समर्थक केपीसीसीचे कार्याध्यक्ष सलीम अहमद यांच्याकडे रमेश यांचे नाव वगळल्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आले.
सलीम अहमद याना भेटण्याची परवानगी देण्यासाठी जोरदार मागणी केली . .माजी आमदार रमेश कुडची समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरु झाल्याने , सलीम अहमद बाहेर आले आणि त्यांची समजूत काढली .दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक माजी आमदार रमेश कुडची यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
इच्छुक रमेश कुडची यांनी अर्ज बाजूला काढल्याने , त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली. पुढे आलेल्या बाबू बागवान आणि समर्थकांनी ते नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी त्यांनी त्यांना काँग्रेस कार्यालयात जाऊ देण्यास नकार दिला.त्यामुळे नेत्यांच्या विरोधात नाराजी पसरली . अर्ज बाजूला काढण्यावरून गदारोळ झाला .
काँग्रेस कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले . सिद्धरामय्या आणि डीके यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावण्यात आली होती
बेळगावी, हुबळी, धारवाड, विजयपूर, बागलकोट, गदग हावेरी जिल्ह्यातील तिकीट इच्छुकांची तिकीट वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या आगमनापूर्वीच काँग्रेस कार्यालयात गोंधळ उडाला


Recent Comments