जगद्गुरू श्री रेणुकाचार्य यांच्या जयंतीनिमित्त , शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली . आ . अनिल बेनके यांनी जगद्गुरू श्री रेणुकाचार्यांच्या रथातील मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ केला .

सरकार पहिल्यांदाच सिद्धांत शिखमणी जगद्गुरू श्री रेणुकाचार्य यांची जयंती साजरी करीत आहे . त्यानिमित्ताने , बेळगाव जिल्हाप्रशासनाकडून , जगद्गुरू श्री रेणुकाचार्य जयंतीची मिरवणूक काढण्यात आली . आ . अनिल बेनके यांनी श्री रेणुकाचार्यांच्या मूर्तीचे पूजन करून , मिरवणुकीचा शुभारंभ केला .
शहरातील अशोक सर्कल येथून मिरवणुकीचा प्रारंभ झाला . केला तलाव , अशोक सर्कल मार्गे ही मिरवणूक कुमार गंधर्व रंग मंदिर येथे समाप्त झाली. या मिरवणुकीत विविध कलापथकाने सहभागी झाली होती .

या मिरवणुकीत हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, वीरपक्षया नीरलगीमठ, मुक्तार हुसेन पठाण, गणेश मठपती आदी उपस्थित होते.


Recent Comments