Belagavi

लिंगायतांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच नाही :डॉ . प्रभाकर कोरे

Share

राज्याचे मुख्यमंत्री लिंगायत असल्याने , लिंगायतांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच येत नाही असे बेळगावच्या , केएलई संस्थानचे कार्यध्यक्ष डॉ . प्रभाकर कोरे म्हणाले .

बेळगावमध्ये ,संत श्री बसवेश्वरांची नूतन मूर्ती प्रतिष्ठापनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी , पत्रकारांनी विचारलेल्या , सरकार ,लिंगायत समाजाकडे तिकीट वाटपात दुर्लक्ष करीत आहे का या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते .

अद्याप तिकीट वाटप केलेले नाही. काहीही असो. . अपप्रचाराकडे लक्ष देऊ नका . भारतीय जनता पक्ष असो वा कोणताही पक्ष, कर्नाटकात लिंगायतांकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. आधीच्या निकालांकडे लक्ष देऊ नका . लिंगायतांची उपेक्षा झाली तर काय होईल? पण ते होणार नाही कारण वीरशैव लिंगायतांमध्ये अनेक सुशिक्षित लोक आहेत. राजकीयदृष्ट्या वीरशैव लिंगायत हे सुरुवातीपासूनच बुद्धिमान आहेत.

वीरशैव लिंगायत दुर्लक्षित राहिल्यास कठीण जाईल, असा संदेश प्रभाकर कोरे यांनी दिला.

Tags: