राजहंस गड येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची दुर्गसेवा संस्थेतर्फे दर रविवारी जलाभिषेक, दुग्धाभिषेक व पाद्यपूजा करण्यात येणार आहे.
यासाठी लागणारे पूजेचं व इतर साहित्य श्री दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ आणि श्री दैवज्ञ संघातर्फे दुर्गसेवा संघाचे अध्यक्ष नरेंद्र बेळगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीला राजू बेकवाडकर, अतुल पारिशवाडकर, दीपक अडकूरकर, नितीन कलघटकर, दीपक कलघटगी, मंजुनाथ कलघटकर यांच्याहस्ते जलाभिषेक, पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी ध्येयमंत्र म्हणून आरती करण्यात आली.
श्री दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ आणि श्री दैवज्ञ संघातर्फे दुर्गसेवा संघाला गेल्या ८ वर्षांपासून राजहंस गड व भुईकोट किल्ला येथे स्वच्छतेसाठी साहित्य, फलक व अन्य साहित्य देण्यात येत आहे. श्री दुर्गसेवा-बेळगाव या संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या गडांवर जाऊन स्वच्छता अभियान राबवितात, याबद्दल दैवज्ञ सेवा संघातर्फे विजयक कणबरकर, हेमंत मुतकेकर यांनी गौरवोद्गार काढून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल शिरोडकर, महांतेश कलघटकर, मंजुनाथ मोदगेकर, वैभव आचरेकर, शुभम कारेकर, राघवेंद्र काकतीकर, राजू पाटणकर तसेच दुर्गसेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Recent Comments