रस्त्याच्या कडेला असलेल्या सुक्या कचऱ्याच्या ढिगावर पेटती सिगरेट फेकून दिल्याने कचऱ्याने पेट घेतला आणि नंतर पार्क केलेली कार या आगीत भस्मसात झाली. ही विचित्र घटना विजापूर शहरात घडली.
विजापूर शहरातील बबलेश्वर रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला असलेल्या सुक्या कचऱ्यावर काही बदमाशानी पेटती सिगारेट पेटल्याने आग लागल्याची घटना घडली. बदमाशांनी सिगारेट न विझवता कचऱ्यात फेकल्याने ही आग लागली आणि तेथील कार जळून खाक झाली. ही कार कोणाच्या मालकीची होती, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझवली. ही घटना गांधीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली


Recent Comments