Belagavi

स्प्रिंकलर फवाऱ्यांनी यंदा रंगणार होलीमिलन ! आ. अभय पाटलांकडून तयारीची पाहणी

Share

बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने होत असलेल्या यंदाच्या 15व्या होलीमिलन कार्यक्रमात स्प्रिंकलर फवारे आणि डीजे रेशीम खास आकर्षण असणार आहे.

टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस मैदानावर होणार असलेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आ. अभय पाटील यांनी मैदानाला भेट देऊन तयारीची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेली 14 वर्षे सातत्याने आम्ही होलीमिलनचे आयोजन करत आहोत. मध्यंतरी दोन वर्षे कोरोनामुळे त्यात खंड पडला.

 

मात्र गेल्या वर्षांपासून पुन्हा आयोजन केले जात आहे. यंदा सिलेंडर स्प्रिंकलर फवारे हे होलीमिलनचे मुख्य आकर्षण असेल. यातून विविधरंगी रंग फवारा येतात. सुमारे 400हुन अधिक स्प्रिंकलर फवारे आणले आहेत. त्याशिवाय खास युवकांच्या आग्रहास्तव डीजे रेशीमला होलीमिलनसाठी निमंत्रण दिले आहे. बेळगावच्या युवावर्गाने, जनतेने होलीमिलनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यांच्यामुळे बेळगावची होळी देशात प्रसिद्ध झाली आहे. दहा हजार महिला एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करणे ही साधी बाब नाही.

 

पण बेळगावच्या युवती-महिलांनी ते शक्य करून दाखवले आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी आभार मानतो. उद्या सकाळी नऊ वाजता मैदानावर येऊन होलीमिलनच्या माध्यमातून रंगोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन आ. अभय पाटील यांनी केले. बाईट
यावेळी आ. अभय पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सिलेंडर स्प्रिंकलर फवाऱ्यांची प्रात्यक्षिकं दाखवली.

Tags: