Dharwad

काँग्रेसचा 9 मार्चचा कर्नाटक बंद हास्यास्पद : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

काँग्रेसने 9 मार्चला पुकारलेला कर्नाटक बंद हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. काँग्रेसचे हात भ्रष्टाचारात बुडाले आहेत. जनता या बंदला पाठिंबा देणार नाही असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
हुबळीतील आपल्या निवासस्थानाजवळ प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, आरोप करणाऱ्यांचे हात आधी स्वच्छ असायला हवेत. मग किंमत येते. काँग्रेसने उशी आणि अंथरुनही सोडलेला नाही. बिस्किटे आणि कॉफीमध्येही भ्रष्टाचार केलाय. काँग्रेसने प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे. एम. बी. पाटील, जॉर्ज, महादेवप्पा यांना विचारावे लागेल, की अशी किती टार्गेट सिद्धरामय्या यांनी दिली होती. भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडलेल्यांनी असे आरोप केले तर चालणार नाही, असेही ते म्हणाले.

देशात काँग्रेसने पूर्ण बंद पुकारला आहे. त्यामुळे राज्य बंद करण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसची किती कर्मकांडं सांगावीत? एक का दोन? बंदच्या माध्यमातून आपले राजकीय भवितव्य लिहिता येईल, असा विचार करणे मूर्खपणाचे आहे. निवडणुकीचा आखाडा असून जनताच त्यांचा पाडाव करणार असल्याचे ते म्हणाले.

 

बेळगावातील राजहंसगड येथील शिवाजी पुतळ्याचे काँग्रेसने पुन्हा उद्घाटन केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ही हास्यास्पद बाब आहे. सरकारने येऊन मूर्तीचे उद्घाटन करायचे आणि नंतर यांनी पुन्हा करायचे, हे योग्य नाही. शासनाकडून उद्घाटन झाल्यानंतरही केवळ प्रतिष्ठेसाठी हे केले जाते. राष्ट्रीय नेत्यांच्या नावावर असे राजकारण करणे योग्य नाही असे बोम्मई म्हणाले.

मंगळूर कुकर बॉम्बस्फोट प्रकरणाची जबाबदारी इसिसने स्वीकारल्याचे मुद्द्यावर बोम्मई म्हणाले, आता डीकेशी काय म्हणतात ते ऐकू. फक्त साधा कुक्कर असे डीकेशी म्हणाले होते. भाजप याचा गैरवापर करत आहे, असे ते म्हणाले होते. आता डीकेशीना या मुद्द्यावर काय म्हणायचे आहे ते विचारा, असा पलटवार त्यांनी केला.
बाइट

Tags: