Belagavi

आपल्यावर दाखल गुन्ह्यांबाबत नंतर पाहीन : आ. हेब्बाळकर

Share

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन केल्याबद्दल भाजप सरकारने माझ्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. पुरातत्व विभागाने चार वेळा नोटीस दिली आहे याबाबत नंतर बघून घेईन असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या देशातील भव्य पुतळ्याच्या अनावरण समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेला हा किल्ला आहे. येथे शिवरायांचा पुतळा उभारल्याबद्दल माझ्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर येत्या काही दिवसांत काय ते पाहू. राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 कोटी रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. मी त्याचे स्वागत करते असे त्यांनी सांगितले.

माझे डोळे पिवळे नाहीत, कावीळ झालेल्या डोळ्यानी मी काहीही पाहू शकत नाही. खूप सकारात्मक विचार करा
मला जे काही बोलायचे होते ते मी माझ्या भाषणात सांगितले आहे. मी कोणाला काही बोलले नाही. मात्र त्यांनी शिवभक्तांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांच्या अपूर्ण मूर्तीचे उद्घाटन करून महाराजांच्या भक्तांचा अपमान केला आहे असा आरोप हेब्बाळकर यांनी केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माझ्याकडून 50 हजार कर्ज घेतले आणि ते परत केले नाहीत, या माजी आमदार संजय पाटील यांच्या वक्तव्याबाबत बोलताना, तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन मोठ्या आनंदात आणि कौतुकाने केले, पण महिलांचा अवमान केलाय. संजय पाटील यांनी कैकेयीशी त्यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावर, शिवाजी महाराज महिलांना मान देत, असे शिवभक्त सांगतात, ते कोण आहेत हे तुम्ही मला भाषणात आधीच सांगितले आहे. त्याना पत्नी आणि एक मुलगी आहे. मी कैकेयी आहे म्हणणाऱ्याच्या कन्येला आणि पत्नीला मग काय म्हणावे? श्रीरामचंद्रांबद्दल ते बोलले नाहीत. यावर मी निवडणुकीनंतर उत्तर देईन. उद्यापासूनच निवडणुकीची तयारी सुरु करणार आहे. मी एक दिवसही थांबलेली नाहीय. उद्यापासून प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांची मुलगी म्हणून मतयाचना करणार आहे असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

एकंदर, आपल्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांना निवडणुकीनंतरच योग्य उत्तर देईन असा इशारा आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला आहे.

Tags: