Belagavi

बाळेकुंद्रीखुर्द कन्नड शाळेच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप; भीमसेनेची निदर्शने

Share

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील कन्नड शाळेच्या विकासकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक भीमसेनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यक्यासमोर निदर्शने करण्यात आली.

बाळेकुंद्री खुर्द गावातील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या जीर्णोद्धार कामात सुमारे तीन लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दलित कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कर्नाटक भीमसेनेच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा काढून तेथे निदर्शने केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटक भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार आणि उपाध्यक्ष अक्षय के. आर. यांनी, बाळेकुंद्री खुर्द कन्नड शाळेच्या विकास कामात किमान तीन लाख रुपयांचा गोलमाल झाल्याचा आरोप केला. दोन हजारांच्या जेसीबीने केलेल्या दोन तासांच्या कामासाठी दहा हजारांचे बिल दाखवून वसूल केल्याचे सांगितले. या संदर्भात विचारणा केल्यावर तुम्ही विचारणारे कोण असा प्रश्न मुख्याध्यापक करतात. याबाबत डीडीपीआय, बीईओना निवेदन देऊन चौकशी करण्याची विनंती करूनही काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

निदर्शनानंतर जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. शिरस्तेदार एम. एस. परगी यांनी निवेदन स्वीकारले.

Tags: