Belagavi

काँग्रेस नेते काचेच्या घरात; जादा खुश होण्याची नाही गरज : बांधकाम मंत्री सी. सी. पाटील

Share

चेन्नागिरी मतदारसंघातील भाजपचे आमदार मादाल विरुपाक्षप्पा यांच्या मुलावर लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यामुळे भले काँग्रेस खूश असेल मात्र, त्या लोकायुक्ताना आम्हीच बळ दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी सांगितले.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सी. सी. पाटील म्हणाले, काँग्रेसने आपल्यावरील भ्रष्टाचाराचे खटले झाकण्यासाठी लोकायुक्त संस्था बंद करून एसीबीची स्थापना केल्याचे न्यायमूर्ती केम्पण्णा यांनी आपल्या आयोगाच्या अहवालात म्हटल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सांगितले होते.

लोकायुक्तांकडे काँग्रेस नेत्यांची अजूनही 50 प्रकरणे प्रलंबित आहेत, काँग्रेसला आनंद होऊ शकतो की आमचे छोटे प्रकरण आहे, पण त्यांना खूश होण्याची गरज नाही, ते काचेच्या घरात बसले आहेत, आम्हीच लोकायुक्तांना बळ देऊन पुन्हा आणले आहे.

न्यायमूर्ती केम्पण्णा यांच्या आयोगाच्या अहवालात नमूद केल्यानुसार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 800 एकर जमीन डी नोटिफाय केली आहे. हा अहवाल सभागृहात का सादर केला नाही, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. सिद्दरामय्या मुख्यमंत्री असताना 800 एकर जमिनीचे डी नोटिफिकेशन केल्याचा ठपका न्या. केम्पण्णा आयोगाच्या अहवालात ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: यावर चर्चेचा प्रस्ताव सभागृहात ठेवला. त्यावर चर्चेला येणार असल्याचे सांगत सिद्धरामय्या सभागृहातून अनुपस्थित राहतात आणि माझ्या अनुपस्थितीत अहवाल मांडला म्हणत व्यर्थ टीका करतात असे म्हणत सी. सी. पाटील यांनी सिद्दरामय्या आणि काँग्रेसवर ताशेरे ओढले.

Tags: