Belagavi

पुढील निवडणुकीत भाजपचा होणार चुराडा; काँग्रेस पुन्हा येणार सत्तेत : सिद्दरामय्या

Share

संपूर्ण राज्यात काँग्रेस समर्थक वादळ सुरू झाले आहे. पुढील निवडणुकीत भाजपचा चुराडा होणार आहे
काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास आहे असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी सांगितले.

बेळगावातील काँग्रेस भवनात सिद्धरामय्या यांची महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, बसवकल्याणहून काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा सुरू झाली असून, प्रजाध्वनी यात्रेचा दुसरा टप्पा पूर्ण करून एक महिना झाला आहे. आजवर 40 हून अधिक मतदान केंद्रांना भेटी देण्यात आल्या आहेत. प्रजाध्वनी यात्रेतून लोकांच्या भावना, सूचना, समस्या जाणून घेतल्या. जनतेच्या इच्छेवर आधारित राज्याच्या विकासासाठी जाहीरनामा तयार केला पाहिजे. लोकांच्या समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी आम्ही प्रजाध्वनी यात्रा करत आहोत. यात्रा दोन गटात सुरू आहे. मी दक्षिण कर्नाटकात प्रवास करत आहे तर केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार मुंबई कर्नाटक भागात यात्रा करत आहेत. लोक आमच्या अपेक्षांना प्रतिसाद देत आहेत
यावेळी महिला व युवक अधिक प्रमाणात सहभागी होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 10 ते 25 हजार लोकांची गर्दी होत आहे. राज्यातील जनता काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहे हे यावरून सिद्ध होते असे ते म्हणाले.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले, राज्यात 4 वर्षे भाजपची आणि केंद्रात 9 वर्षे सत्ता आहे. राज्यात भाजप मागच्या दाराने सत्तेत आला आहे. भाजपच्या राजवटीला जनता कंटाळली आहे. भाजपच्या जातीयवादी सरकारने वाट्टेल ते केले. आधी काँग्रेस, जेडीएसने कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवले. नंतर आमदारांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी सत्ता गमावली. त्यानंतर ऑपरेशन कमळनंतर भाजपची सत्ता आली. पण भाजपने सुशासन दिले नाही. तो फक्त भ्रष्टाचारात गुंतला आहे. येडियुरप्पा आणि बोम्मई यांच्या काळातही जनतेची लूटमार झाली. 40% कमिशनच्या भ्रष्टाचाराबाबत कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. पत्र लिहून दीड वर्ष उलटले तरी पंतप्रधानांनी कारवाई केली नाही. त्यावरून पंतप्रधानही यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे

काल हुक्केरी येथे भाषण करत असताना मला कोणीतरी चिट्ठी दिली. ते 40 नाही तर 53 टक्के कमिशन असल्याचे सांगितले. सीएम बोम्मई म्हणतात मला भ्रष्टाचाराची कागदपत्रे द्या, कंत्राटदार संघटना अध्यक्षांचे पत्र पुरेसा पुरावा नाही का? बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केली हा पुरावे नाही का? काल चेन्निगेरीचे आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा लेखाधिकारी लाच घेताना पकडला गेला. हे सर्व सरकारच्या भ्रष्टाचाराचे पुरावे नाहीत का? असा खडा सवाल त्यांनी केला.

मी मुख्यमंत्री असताना आरोप झाल्यानंतर लगेचच सीबीआयकडे 8 प्रकरणे तपासासाठी दिली होती. केंद्रात भाजपचे सरकार होते. 6 प्रकरणांमध्ये बी अहवाल प्राप्त झाला आहे. डीके रवी, गणपती, परेस मेस्ता यांच्यासह सर्व प्रकरणे सीबीआयकडे देण्यात आली. निव्वळ आरोपापोटी मी ते चौकशीसाठी दिले होते आणि त्यांनी तक्रार दाखल केली होती असे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपच्या आरोपांवर सिद्दरामय्या म्हणाले, पाच वर्षे विरोधी पक्षात असताना तुम्ही आवाज उठवला नाही?, तुम्ही सत्तेत येऊन चार वर्षे चौकशी का केली नाही? तुम्ही कडबू खात आहात की शेंगदाणे, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला
विरुपाक्षप्पा यांच्या मुलाच्या घरात 6 कोटी रुपये सापडले. मग हा पैसा येतो कुठून?, विरुपाक्षप्पा माडाळ ज्येष्ठ आमदार, येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय आहेत. प्रत्येकासाठी अमुक इतके निश्चित केले आहे का?, असा सवाल सिद्दरामय्यांनी केला.

पंतप्रधानाना आणून उद्घाटन करत आहेत, ती सर्व आम्ही केलेली कामे आहेत. तांड्यांना महसुली गावे करण्याचा कायदा आम्हीच आणला. सरकारी जमीन, वनजमीन, खाजगी जमिनीत बांधले. आम्ही केलेल्या कार्यक्रमांना ते पंतप्रधान आणि केंद्रीय नेत्यांना आणतात आणि त्यांचे उद्घाटन करतात, ते प्रचारासाठी आणि जाहिरातींसाठी सरकारी पैसे वापरत आहेत. मी बस व्हिडिओमध्ये म्हटले आहे की मोदी 500 रुपये देऊन रोड शोसाठी लोकांना आणतात, भाजपने त्याचा विपर्यास केला. असे करूनच ते सत्तेत आल्याचे सांगितले.

मोदी इतकं खोटं बोलतात की कुणी म्हणू नये की मोदीसाहेब, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी खोटं बोलू नका, त्यांच्यावर कारवाई करा ही सगळी त्यांची बुद्धिमत्ता आहे. ते मंत्र्याला सांगू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. मर जा मोदी मर जा मोदी म्हणतात म्हणे, पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर ते सर्वसामान्यांचे संरक्षण कसे करणार, असा सवाल सिद्दरामय्यांनी केला. बाईट
यावेळी पत्रकार परिषदेला केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी, जमीर अहमद, माजी मंत्री डी. बी. इनामदार, काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिकोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार अशोक पट्टण, फिरोज सेठ आदी उपस्थित होते.

Tags: