Belagavi

नॅशनल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्ट शाळेचा तिसावा वर्धापनदिन

Share

गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा दृष्टीने अतिशय लहान जागेत सुरु केलेल्या या शाळेने आज यशस्वीपणे ३० वर्षे पूर्ण केली आहेत याच श्रेय देणगीदारांना जाते , असे नॅशनल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष इसाक मुल्ला यांनी सांगितले .

नॅशनल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेचा ३० वा वर्धापन दिन आणि देणगीदारांची सत्कार समारंभ पार पडला . १९९४ साली , क्लब रोडवर , नॅशनल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टची बालवाडी ते पाचवीपर्यंतची शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली होती . यासंबंधी माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष इसाक मुल्ला यांनी सांगितले कि , एकदम लहान जागेत आम्ही गोरगरीब मुलांसाठी शाळा सुरु केली . विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हा आमचा हेतू होता .

शाळा सुरु केल्यापासून आतापर्यंत आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला . मात्र त्यावर मात करून यशस्वीपणे शिक्षणाची ३० वर्षे पूर्ण करीत आहोत . यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे . त्या सर्वाना आम्ही संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो . तसेच शाळेच्या नूतनीकरणासाठी अनेक दानशूरांनी हातभार लावला , त्यांना देखील विद्यर्थी , पालक तसेच शाळेच्या वतीने धन्यवाद देतो .

यावेळी उद्योजक नागेश छाब्रिया, सचिन सबनीस तसेच अन्य देणगीदारांचा तसेच कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या लोकांचा सत्कार करण्यात आला .
यानंतर संस्थेचे सेक्रेटरी नूरानी यांनी सांगितले कि , आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार , खाजगी शाळांमध्ये जे उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते त्याप्रकारेच सर्व देणगीदारच्या सहकार्याने आम्ही शाळेत , नवीन तंत्रज्ञान अवलंबून ,उच्च दर्जाचे शिक्षण देत आहोत . कोवीड काळात आम्हाला सिलेंडर देखील मिळत नव्हता त्यावेळी लोकांनी आम्हाला मदत केली .
यावेळी संस्थेच्या प्रशासन मंडळातील पदाधिकारी आणि सदस्य , त्याचप्रमाणे देणगीदार , पालक , आणि विद्यार्थी उपस्थित होते .

Tags: