रामदुर्गचे माजी आ . अशोक पट्टण याना काँग्रेस पक्षाचे तिकीट देऊ नये या मागणीसाठी रामदुर्गच्या जनतेने , माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या राहत असलेल्या खासगी हॉटेलसमोर आंदोलन केले .
रामदुर्गचे माजी आ . अशोक पट्टण याना आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट न देता ते चिक्करेवाण्णा याना द्यावे या मागणीसाठी रामदुर्ग च्या जनतेने मोठया संख्येने बेळगाव शहरातील , माजी मुख्यामंत्री राहत असलेल्या एका खाजगी हॉटेलसमोर आंदोलन केले .

यावेळी आंदोलक जनतेने जोरदार घोषणाबाजी केली . काँग्रेसचे तिकीट चिक्करेवण्णांना द्यावे अशा आशयाचे फलक घेऊन घोषणाबाजी करीत ते सिध्दरामय्या त्यांना भेट देण्याची वाट पाहत होते .
मात्र सिध्दरामय्यांनी आंदोलकांची भेट न घेतल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली . स्वामीजींनी देखील ह्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ सुरूच होता . (फ्लो )
यावेळी रामदुर्गाच्या महिला मतदार देखील मोठया संख्येने उपस्थित होत्या .


Recent Comments