बेळगाव येथील डॉ. बी.आर.आंबेडकर शक्ती संघाने नूतन जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती केल्याचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांनी सांगितले.
शहरातील आंबेडकर गार्डन येथे संघटनेच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. लक्ष्मण कोलकार यासंबंधी माहिती देत होते .
दीपक गंगाराम कांबळे यांची बेळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खानापूर तालुकाध्यक्षपदी रवी मादार यांची निवड झाली आहे. आगामी काळात संघटनेला बळ देऊन गोरगरिबांची व समाजाची सेवा करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
लक्ष्मण दशरथ कोलकार संस्थापक व प्रदेशाध्यक्ष, सागर कोलकार प्रदेश उपाध्यक्ष, विनायक पाटील, सुरेश कोलकार अभिषेक देवरमनी, बाबू पुजारी, अजय करपाणी, शोभा मत्तीवडे, कस्तुरी निंगन्नावर, सर्व उपस्थित होते.


Recent Comments