Belagavi

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिक्षक संघटनेचा पाठिंबा

Share

सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने उद्यापासून पुकारलेल्या संपाला कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेने पाठिंबा दिला आहे.

बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस रामू गुगवाड यांनी ही माहिती देऊन सांगितले की, राज्यातील अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अनुदानित-विनाअनुदानित असा भेद न करता माध्यमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना समान सुविधा द्याव्यात, त्यांना आरोग्य संजीवनी कवच द्यावे आदी आमच्या मागण्या आहेत. त्या सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात यासाठी उद्यापासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला आम्ही पाठिंबा दिला आहे. नवी पेन्शन योजना रद्द करून जुनीच योजना सुरु ठेवावी, सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत ४०% अंतिम भरपाई द्यावी या सरकारी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांना राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटक राज्य हायस्कूल सहशिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस रामू गुगवाड आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि कर्नाटक माध्यमिक शाळा-महाविद्यालय कर्मचारी संघटना बेळगावचे अध्यक्ष एस. एस. मठद त्याचप्रमाणे सरचिटणीस सलीम कित्तूर, एम. ए. कोरीशेट्टी, अशोक खोत, प्रवीणकुमार होसुर आदी उपस्थित होते.

Tags: