Belagavi

बिदर मधील बसवकल्याण येथे लिंगायतांचे प्रथम राष्ट्रीय लिंगायत महा अधिवेशन

Share

जागतिक लिंगायत महासभेच्या राष्ट्रीय संघटनेच्या नेतृत्वाखाली , प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन ४ आणि ५ मार्च २०२३ रोजी , बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे आयोजित केले जाणार असल्याची माहीती जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी दिली .

शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी सांगितले कि , जागतिक लिंगायत महासभा ही लिंगायतांची प्राथमिक संस्था आहे . बाराव्या शतकात जगद्गुरू बसवण्णा यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा मानवी मूल्ये आणि समानतेचा धर्म आहे . लिंगायत धर्माची तत्वे , सिद्धांत , आणि मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने लिंगायत महासभा स्थापन करण्यात आली आहे . १२ व्या शतकात स्थापन केलेल्या स्वतंत्र लिंगायत धर्माला , अल्पसंख्यांक आणि संविधानात्मक मान्यता मिळावी हा जागतिक लिंगायत महासभेचा मुख्य उद्देश आहे .

यासाठीच ४ आणि ५ मार्चला , बिदर जिल्ह्यातील , बसवकल्याण प्रहम राष्ट्रीय लिंगायत महासभा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे . बिदर मध्ये हे अधिवेशन आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे , बसवकल्याण लिंगायतांचे पवित्र क्षेत्र आहे . बसवण्णांची कर्मभूमी आहे . शिवाय या ठिकाणी अनुभवमंडप स्थापन केलेला आहे . या महाअधिवेशनात लिंगायतपर , बसवपर संघटना , राष्ट्रीय बसवदल , लिंगायत धर्म महासभा , बसवदल , बसव समिती बेंगळूर , साहित्य परिषद , लिंगायत मठाधीश संघ , बसवेश्वर पंचकमिटी , बसवकल्याण तसेच अन्य अनेक संघटनांच्या सहकार्याने हे महा अधिवेशन भरवण्यात आले आहे . कर्नाटक , महाराष्ट्र , आंध्र प्रदेश , तेलंगणा , तामिळनाडू , तसेच हजारोंच्या संख्येने , बसवकल्याण महा अधिवेशनामध्ये , सहभागी होणारं आहेत . या मेळाव्यात कोणत्याही राजकीय पक्ष तसेच राजकीय पक्षाच्या नेत्याला आम्ही व्यासपीठावर घेणार नाही असे त्यांनी स्पष्टई केले .

या अधिवेशनाला विविध मठाधीशांची उपस्थिती राहणार आहे असे बसवराज रोटी यांनी सांगितले . यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: