माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा 1 मार्च रोजी बेळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंतबाळेकुंद्री येथे सकाळी 10 वाजता भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी पंतबाळेकुंद्री मैदानावर जाऊन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.
बेळगाव जिल्ह्यात 1 ते 5 मार्च दरम्यान प्रजाध्वनी यात्रा काढण्यात येणार आहे. पहिला कार्यक्रम ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणार आहे. केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम.बी.पाटील, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री विनय कुलकर्णी, जमीर अहमद आदी नेते सहभागी होणार आहेत.

लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी यांनी पंतबाळेकुंद्री येथे जाऊन महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तयारीची पाहणी करून सूचना दिल्या. मैदानात 25 हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या असून या प्रजाधवानी यात्रेसाठी , 30 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमातूनच प्रजाध्वनी यात्रेचे बेळगाव जिल्ह्यात स्वागत करण्यात येणार असल्याचे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
या वेळी बेळगाव जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी , तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष शंकर गौडा पाटील, स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments