Vijayapura

महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच प्रसूती

Share

वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्याने,रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसूती झाल्याची घटना विजापूर तालुक्यातील नागठाण येथे घडली आहे .

विजापूर तालुक्यातील चभना दोड्डी येथील अनु बीवू कोळेकर या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्याने तिला नागठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता रुग्णालयासमोरच प्रसूती झाली. रुग्णालयाला कुलूप असल्याने ऑटोचालक आणि आजीच्या मदतीने प्रसूती झाली. बाळाला जन्म दिल्यानंतर अर्धा तास नवजात अर्भकाची नाळ कापली गेली नसल्याची तक्रार महिलेने केली.

वेळेवर न येणाऱ्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांविरोधात जनतेने रोष व्यक्त केला आहे. रुग्णालयात कर्मचारी नसल्याचे पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. वेळेपेक्षा अर्धा तास निघून गेलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रसूत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

 

Tags: