राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी बेळगाव सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायव्वगोळ यांनी केली .
शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ते संबोधीत करीत होते . N.P.S. मधून OPS अंतर्गत आणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सक्षम करावे.पंजाबसह चार राज्यांनी पूर्वीच जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तसेच कर्नाटक राज्यात ही पद्धत सुरू ठेवावी आणि एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, असेही ते म्हणाले.
यासाठी १ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे . सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होऊन आपल्या कामावर हजर राहू नये असे त्यांनी सांगितले.
राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने आमच्या विविध मागण्यांचा त्याग केल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन पुकारले आहे . त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा संप यशस्वी करावा, असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर राज्य कर्मचारी संघाचे जिल्हा सचिव शंकर गोकावी, राज्य परिषद सदस्य लगमण्णा रंगण्णा, जिल्हा कोषाध्यक्ष श्रावण राणवगोल आदी उपस्थित होते.


Recent Comments