Belagavi

मुतगा गावात जैन समुदाय भवनाचे आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले उदघाटन

Share

देशाच्या साहित्य, कला, संस्कृती, वारसा यासह सर्वच क्षेत्रात जैनांचे योगदान मोठे आहे. असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

मुतगा गावात भगवान श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या नवनिर्मित समुदाय भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

त्या म्हणाल्या कि “ग्रामीण भागातून मी आमदार म्हणून निवडून आले हे कोणत्या जन्माचे पुण्य मला माहीत नाही. तुमचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद आकाशापेक्षाही मोठे आहेत. तुम्ही परिवारातील मुलीप्रमाणे माझी काळजी घेत आहात. सर्व विकासकामांना जनतेने दिलेले सहकार्य अविस्मरणीय आहे. असेच प्रेम, प्रोत्साहन आणि सहकार्य मिळू देत . आगामी काळात मतदारसंघातील जनतेची कन्या म्हणून मी अधिकाधिक विकासकामे करून जनतेच्या पाठीशी राहीन, असे त्या म्हणाल्या .


कार्यक्रमास स्वस्ती श्री सुमथीसागर महाराज, किरण पाटील, रुक्मिणी सिंगारी, नागेश देसाई, सुरेंद्र बस्तवाड , श्याम मुतगेकर, स्नेहल पुजारी, सुनिल पाटील, , सर्व जैन समाजाचे नेते, प्रभाकर बेळगावकर आदी उपस्थित होते.

Tags: