Belagavi

संत गाडगेबाबांच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक

Share

२३ फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंती कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन , बेळगावच्या मराठा रजक परीट समाजाचे विठ्ठल भरम पाळेकर यांनी केले .

श्री संत गाडगेबाबा मूर्तीच्या मिरवणुकीदरम्यान ते माहिती देत होते . ते म्हणाले कि , श्री संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त , अनगोळ येथिल मूर्तिकार जे जे पाटील यांनी तयार केलेली गाडगेबाबांची मूर्ती आम्ही गाडगेबाबा भवनामध्ये घेऊन चाललो आहे . बसवेश्वर सर्कल पासून हुलबत्ते कॉलनीतील गाडगेबाबा भवनापर्यंत मूर्तीची मिरवणूक काढत आहोत .

समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत . त्याचप्रमाणे २३ फेब्रुवारीला , श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंती कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले .

बसवेश्वर सर्कल पासून सुरु झालेली ही मिरवणूक संत गाडगेबाबा भवनापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली .  यावेळी समाज संघटनेचे पदाधिकारी , समाज बांधव या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Tags: